Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूह शिवडी येथे नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर पदाकरीता बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 02 जागा
भरती विभाग : मुंबई महानगरपालिका
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : क्ष-किरण सहाय्यक (X-Ray Assistant)
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील वी.पी.एम.टी (Bachelor of Paramedical Technology in Radiology) हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. व 6 महिन्यांची इंटर्नशीप पूर्ण केलेली असावी.
किंवा उमेदवार 12 वी नंतर रेडीओग्राफी या विषयातील पदवीका परीक्षा (12+ Diploma in Radiography) परिक्षा उत्तीर्ण असावा व क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा. उमेदवारमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान (B.Sc in Physics) पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा व रुणालयातील क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा.
आणि ii) उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी (Trade Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Links
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा शुल्क : सदर भरती साठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 + 18% GST रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. (सदर शुल्क हे नापरतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
निवड प्रक्रिया : i) सदर पदांची विहिती केलेली शैक्षणिक अहर्ता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल. ii) मुलाखतीचे ठिकाण,दिनांक व वेळ अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या email वर दोन दिवस आधी कळविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 ऑक्टोंबर 2025
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : महा भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ! येथे आवेदन करा ! Maha Bhumi Abhilekh Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.