मुंबई महानगरपालिका भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर | Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूह शिवडी येथे नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर पदाकरीता बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 02 जागा

भरती विभाग : मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : क्ष-किरण सहाय्यक (X-Ray Assistant)

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील वी.पी.एम.टी (Bachelor of Paramedical Technology in Radiology) हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. व 6 महिन्यांची इंटर्नशीप पूर्ण केलेली असावी.
किंवा उमेदवार 12 वी नंतर रेडीओग्राफी या विषयातील पदवीका परीक्षा (12+ Diploma in Radiography) परिक्षा उत्तीर्ण असावा व क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा. उमेदवारमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान (B.Sc in Physics) पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा व रुणालयातील क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा.
आणि ii) उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी (Trade Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Links

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.

परीक्षा शुल्क : सदर भरती साठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 + 18% GST रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. (सदर शुल्क हे नापरतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)

निवड प्रक्रिया : i) सदर पदांची विहिती केलेली शैक्षणिक अहर्ता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल. ii) मुलाखतीचे ठिकाण,दिनांक व वेळ अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या email वर दोन दिवस आधी कळविण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 ऑक्टोंबर 2025

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : महा भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ! येथे आवेदन करा ! Maha Bhumi Abhilekh Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment